मुंबई – कोरोनामुळे मुंबईकरांचा त्रास संपताना दिसतं नाहीय त्यातच भर घातलिय ती काळ्या बुरशीने. मुंबईमध्ये काळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे Black Fungus Case in Mumbai .
मुंबई येथील ७० वर्षीय एका वृद्धामध्ये काळ्या बुरशीची लक्षणे दिसून आली आहेत. या वृद्ध व्यक्तीला मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
२०२१ मध्ये कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेनंतर काळ्या बुरशीची प्रकरणे वाढण्याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती. कोरोनातून बारे झाल्यानंतर अनेक लोक काळ्या बुरशीचे बळी ठरले आहेत.
या आजारमुळे अवयव आणि डोळे निकामी होऊन अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या प्रकारचे रुग्ण वाढत असताना आता काळ्या बुरशीची लागण होऊ लागली आहे.