मुंबईत मागील 12 तासांत 95.81mm पाऊस; भरतीची वेळ संध्याकाळी 4 च्या सुमारास!

WhatsApp Group

मुंबई – मुंबई मध्ये मागील 12 तासांत 95.81mm पाऊस पडला आहे. मुंबईच्या काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुढील काही तास जोरदार पावसाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज भरतीची वेळ संध्याकाळी 4 च्या सुमारास असून 4.01 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.