
Mumbai Drugs Case : मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी जवळपास 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींनाही अटक केली आहे.
यापूर्वी मुंबई पोलिसांनी शिवाजी नगर येथून ड्रग्जची खेप पकडल्यानंतर पोलिस अधिक तपास करत होते. ही खेप पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला. यावर मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष सातत्याने कार्यरत होता. गेल्या 13 तारखेला पोलिसांना मोठे यश मिळाले अंकलेश्वर, गुजरात येथून माल पकडला होता.