मुंबई – दिशा सालियन मृत्यूप्रकरणामध्ये नव्या आरोपांची राळ उडवणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नुकताच मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे.
नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यातं आलं आहे. त्यामुळे आता चौकशीमधून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकासआघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, हे पाहावे लागेल.