या घटनेने मुंबई हादरली, मिळाल्या करोडोंच्या बनावट नोटा
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बुधवारी बनावट नोटा सापडल्या आहेत. याप्रकरणी आत्ता मुंबई पोलिसांनी Mumbai Police सात जणांना अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 7 कोटी रुपयांच्या बनावट नोट जप्त केल्या आहेत 7 crores fake Indian currency in Mumbai .
जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा या 2000 हजारच्या आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 32 जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
टोळीचा महत्वाचा सूत्रधार बनावट नोटा कश्या करायच्या हे यूट्यूबवरून शिकला होता. आणि 4 चार महिन्यात तो बनावट नोटा बनवण्यात माहिर बनला होता.
Mumbai Police Crime Branch arrested 7 persons with fake Indian currency notes of 2000 denominations having a face value of Rs 7 crores. The accused have been sent to police custody till Jan 31 by a court: DCP Sangram Nishandar pic.twitter.com/5lm6qcaZ0H
— ANI (@ANI) January 26, 2022
पोलिसांनी एका घरावर छापा टाकला त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. छापा टाकलेल्या घरातून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा , स्कॅनर, संगणक, प्रिंटर आणि कागदाचे बंडल जप्त करण्यात आले आहे.