समीर वानखडे पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये, नांदेडमध्ये केला 1127 किलो गांजा जप्त

WhatsApp Group

मुंबई – एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून गांजाची मोठी खेप जप्त केली. याबाबत माहिती देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक अधिकारी समीर वानखडे म्हणाले की, नांदेडमध्ये 1127 किलो गांजा जप्त करण्यात आला असून तो आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणला जात होता.


या कारवाईमध्ये दोघांना अटकही करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समीर वानखडे यांनी सांगितले. आर्यन खान प्रकरणानंतर वानखडे यांची ही पहिलीच मोठी कारवाआ आहे.

आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गांजा महाराष्ट्रात आणला जात असल्याची टीप एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीने सोमवारी सकाळी अचूक सापळा रचत गांज्यासह आरोपीना ताब्यात घेतले आहे.