मुंबई – मुंबईकरांचा प्रवास आता आणखीनच सूकर होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईमधील मेट्रोचे ( Two Metro routes will start in Mumbai ) दोन मार्ग सुरू करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो ७ अंधेरी – पूर्व ते दहिसर आणि मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील. या दोन्ही मेट्रो मार्गांचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसरपर्यंत असणार आहे. या १८.५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च ६ हजार ४१० कोटी रुपये एवढा आहे. मेट्रो ७ ही अंधेरी – पूर्व ते दहिसरपर्यंत असणार आहे. या १६.४७ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च ६ हजार २०८ कोटी रुपये एवढा आहे.