आयपीएलच्या 15 व्या हंगामात, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेत पाच सामने गमावले असून ते पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. मुंबईच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली असली तरी गोलंदाजांनी मात्र निराशा केली आहे. त्यामुळे संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. बुमराह व्यतिरिक्त, इतर कोणताही गोलंदाज आपल्या कामगारीने प्रभावित केलं नाहीये.
IPL 2022 मधील मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण म्हणजे खराब लिलाव. MI ने हार्दिक पांड्या, क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ट, कृणाल पंड्या आणि राहुल चहर या खेळाडूंना सोडून दिले आणि त्यांच्या जागी मोठे खेळाडू आणण्यात अपयशी ठरले. मुंबईने ज्या खेळाडूंना सोडले ते आज आपापल्या संघात चांगली कामगिरी करत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन Shane Watson म्हणाला की, इशान किशनवर Ishan Kishan 15.25 कोटी रुपये खर्च करून मुंबईने चूक केली. तो म्हणाला की इशान हा प्रतिभावान खेळाडू असला तरी एवढ्या मोठ्या किमतीत त्याला संघात घेतल्याने मुंबईचा संघ इतर खेळाडूंना घेऊ शकला नाही
शेन वॉटसनने सांगितले की, मुंबईची या मोसमातील कामगिरी पाहून मला आश्चर्य वाटले नाही, MI गुणतालिकेच्या तळाशी आहे कारण त्यांचा इशान किशनवर इतका पैसा खर्च करणे हे चुकिचे होते. त्याच पौशांमध्ये अजून काही चांगले खेळाडू घेता आले असते. इशान एक हुशार आणि कुशल खेळाडू आहे, पण तो 15.25 कोटी रुपये पगार घेण्यास पात्र नाही. तसेच जोफ्रा आर्चर खेळण्यासाठी उपलब्ध नसतानाही त्याला का घेतले तेही समजत नाही, जोफ्राने बरेच दिवस क्रिकेट खेळलेले नाही.