मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा घेतलेला निर्णय आता कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले नाही, त्यांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही.
मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून प्रवास करायचे असल्यास लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. यासंबंधी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टामध्ये ही माहिती दिली आहे.मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असलेला नियम राज्य सरकारकडून कायम ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकारने याबाबतच्या निर्णयाची मुंबई हायकोर्टामध्ये माहिती दिली. मुंबई लोकल आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून प्रवास करण्यासाठी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले असण्याचे बंधन कायम राहणार असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टामध्ये सादर केलेल्या निर्णयामध्ये दिली आहे. राज्य सरकार तो निर्णय आणि आदेश आजच संध्याकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे.