International League T20 2024: मुंबई इंडियन्सने पटकावले आंतरराष्ट्रीय लीग टी-20 चे विजेतेपद, दुबईचा 45 धावांनी केला पराभव

आंतरराष्ट्रीय लीग टी-20 2024 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स एमिरेट्सने दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे किरॉन पोलार्डच्या संघाने लीगचे विजेतेपद पटकावले.

WhatsApp Group

International League T20: आंतरराष्ट्रीय लीग टी-20 सीझन-2 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स एमिरेट्स संघाने दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना निकोलस पुरन आणि आंद्रे फ्लेचर यांच्या झंझावाती अर्धशतकामुळे 20 षटकांत 208 धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दुबई कॅपिटल्स संघाला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 163 धावा करता आल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना दुबईकडून कर्णधार सॅम बिलिंग्सने सर्वाधिक धावा केल्या. बिलिंग्सने 29 चेंडूत 40 धावांची खेळी खेळली. याशिवाय दुबईसाठी टॉम बेंटनने 20 चेंडूत 35 धावा केल्या तर जेसन होल्डरने शेवटच्या षटकात 24 धावांचे योगदान दिले.

ट्रेंट बोल्टची जबरदस्त गोलंदाजी – अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टने मुंबईसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. ट्रेंट बोल्टने 4 षटकात केवळ 20 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय विजयकांतने 4 षटकात 24 धावा देऊन 2 बळी घेतले. या दोघांशिवाय वकार सलामखिल, मोहम्मद रोहिद खान आणि अकील हुसेन यांनीही मुंबईकडून प्रत्येकी एक विकेट घेतली.

निकोलस पूरनची शानदार खेळी – अंतिम सामन्यात निकोलस पुरन आणि आंद्रे फ्लेचर यांनी मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली. निकोलस पूरनने 27 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 2 उत्कृष्ट चौकारही लगावले. पुरण व्यतिरिक्त आंद्रे फ्लेचरनेही आपल्या फलंदाजीचे मोठे योगदान दिले. फ्लेचरने 37 चेंडूत 53 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 3 चौकारही लगावले.

पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी- मुंबईचे सलामीवीर फलंदाज महंमद वसीम आणि कुशल परेरा यांनी झंझावाती सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. वसीम 24 चेंडूत 43 धावा करून बाद झाला तर त्याने 26 चेंडूत 38 धावा केल्या. Mumbai Indians win International League 2024 title

INSIDE MARATHI आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि शेअर चॅटवर आम्हाला फॉलो करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!