
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) सीझनचे सर्वच सामने रोमांचक होतं आहेत. त्यातच आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध (मे 2022, गुरुवार) रोजी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या अत्यंत निराशाजनक स्थितीत आहेत आणि त्यांना त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकण्याची गरज आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आणि गमावण्यासारखे मुंबई संघाकडे आता काहीच राहिले नाही. कारण मुंबईचा संघ आता प्लेऑफमधून बाहेर पडला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी विजय मिळवून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नई आणि मुंबई गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. चेन्नई जर या सामन्यात हरळी तर त्यांची IPL 2022ची मोहीम संपुष्टात येईल. एमएस धोनी प्लेऑफमध्ये पोहोचेल की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
शेवटच्या सामन्यात केकेआरकडून पराभूत झाल्यामुळे मुंबईचा हंगामातील नववा पराभव झाला. त्यांचे आता दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांचा आताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे. याआधी सीझनच्या सुरुवातीला दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा चेन्नईने मुंबईला हरवले होते.
मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, रिले मेरेडिथ, डॅनियल सॅम्स, फॅबियन अॅलन, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन , बेसिन थंपी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, संजय यादव, अर्शद खान.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ – रवींद्र जडेजा , एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, मोईन अली, शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, नरेन जगदीसन, तुषार देशपांडे, दीपक चाहर, अॅडम मिल्ने , ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, केएम आसिफ, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, भगत वर्मा, हरी निशांत, सुब्रांशू सेनापती.