IPL 2022: चेन्नईसोबत हरल्यास मुंबई आयपीएलमधून होणार बाहेर!

WhatsApp Group

आयपीएलच्या 15व्या हंगामातील 33वा सामना रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे Mumbai Indians vs Chennai Super Kings. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या लीगमध्ये मुंबई इंडियन्सची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे.

मुंबईला त्यांच्या 6 पैकी 6 सामन्यात पराभव पत्करला आहे, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जची अवस्थाही काही वेगळी नाहीये. चेन्नईने या मोसमात आजवर खेळलेले 6 पैकी 5 सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ गुणतालिकेत 2 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. या सामन्यात चेन्नईला दुसरा आणि मुंबई आपला  पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

दुसरीकडे, हेड टू हेडचा विचार केला तर मुंबई इंडियन्सचा वरचष्मा पाहायला मिळतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने 19 आणि चेन्नईने 13 सामने जिंकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे, कारण या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्याल त्यांचे आयपीएल 2022 मधील संघाचे आव्हान  जवळपास संपुष्टात येणार आहे

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, जयदेव उनाडकट, टायमल मिल्स, जोफ्रा आर्चर, रिले मेरेडिथ, डॅनियल सॅम्स, फॅबियन अ‍ॅलन, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन , बेसिन थंपी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, संजय यादव, अर्शद खान.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ – रवींद्र जडेजा (सी), एमएस धोनी (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, मोईन अली, शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, नरेन जगदीसन, तुषार देशपांडे, दीपक चाहर, अ‍ॅडम मिल्ने , ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, केएम आसिफ, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, भगत वर्मा, हरी निशांत, सुब्रांशू सेनापती.