
आयपीएल 2022 चा 65वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफमधून बाद झाला आहे. या संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले असून त्यात केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. आयपीएलचा 15वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी खूपच खराब गेला आहे.
आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेला मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील असलेली मुंबई आता जखमी सिंहासारखी आहे, मुंबईने चेन्नईला हरवून त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद केले. याचीच पुनरावृत्ती हैदाराबादसोबत होईल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. या सामन्यात हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. हैदाराबाद हा सामना हरल्यास प्लेऑफचे आव्हान संपुष्टात येणार आहे.
सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण गेल्या काही सामन्यांतील सलग पराभवानंतर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे. तरीही हैदराबादला प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल, तर आगामी दोन्ही सामने तरी जिंकावे लागतील. तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शाश्वती नसली तरी संघाला किमान विजय आवश्यक आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सकडून हा संघ पराभूत झाल्यास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरेल.
मुंबई इंडियन्सचा संभावित संघ – इशान किशन, रोहित शर्मा, डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, हृतिक शोकीन, टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, कुमार कार्तिक
सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ – केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन