राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय तर MI चा सलग दुसरा पराभव

WhatsApp Group

आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. मात्र त्यानंतर मुंबई संघाचे युवा फलंदाज इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतके ठोकली..त्या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आव्हानाचा पाठलाग करण्याचं बळ मिळालं. मात्र ते बळ संघाला विजय मिळवून देण्याएवढ पुरेस नव्हतं. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा २३ धावांनी परभव केला आहे.

मुंबईकडून खेळताना इशान किशनने ५ चौकार आणि एक षटकारासह ५४ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३३ चेंडूत ३ चौकार ५ षटकारांसह सर्वाधिक ६१ धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तर ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

 

बटलरचे वादळी शतक : राजस्थानकडून फलंदाजी करताना रॉयल्सच्या फलंदाजांनी मुंबईकर गोलंदाजांना झोडपून काढले. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या तिघांनी चुकीचा ठरवला. जोस बटलरने या सामन्यात तुफान फटकेबाजीच्या जोरावर झंझावाती शतक ठोकलं. बटलरने या सामन्यात ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले दुसरं आयपीएल शतक पूर्ण केलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत फक्त १७ धावा देत रॉयल्सच्या ३ विकेट्स घेतल्या.

अशी होती मुंबई इंडियन्सची प्लेइंग XI – रोहित शर्मा (कर्णधार ), इशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थंंम्पी

अशी होती राजस्थान रॉयल्सची प्लेइंग X –संजू सॅमसन (कर्णधार ), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल