पहिल्या सामन्यात दिल्लीने दिला मुंबईला पराभवाचा धक्का!

WhatsApp Group

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने Ishan Kishan  नाबाद 81 धावांची खेळी केली तर कर्णधार रोहित शर्माने 41 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन आणि खलील अहमदने दोन गडी बाद केले.

मुंबईने Mumbai Indians विजयासाठी दिलेल्या 178 धावांचे आव्हान  दिल्ली कॅपिटल्सने 18.2 षटकांत सहा विकेट्स गमावून पूर्ण केले. दिल्लीचा संघ अडचणीत असताना ललित यादवने नाबाद 48 आणि अक्षर पटेलने नाबाद 38 धावा करत सातव्या विकेटसाठी अवघ्या 30 चेंडूत 75 धावांची भागीदारी करून दिल्लीला Delhi Capitals रोमहर्षक विजय मिळवून दिला.


मुंबईचा स्टार फलंदाजा इशान किशनने या सामन्यात दमदार खेळी करत 48 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर दिल्लीकडून पहिल्यांदाचा आयपीएल खेळणाऱ्या कुलदीप यादवने पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे. या सामन्यात त्याने मुंबईचे तीन विकेट्स माघारी धाडले