IPL: या हंगामातील सर्वात रोमांचक सामना आज, RCB प्लेऑफ खेळणार की नाही हे Mumbai Indians ठरवणार

WhatsApp Group

शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स Mumbai Indians vs Delhi Capitals  यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही, तर दिल्लीसाठी हा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. दिल्लीचा संघ हा सामना जिंकताच आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनेल.

गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे तर दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फक्त एका जागेसाठी चुरशीची लढत आहे. आज दिल्ली हरली तर बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनेल.

बंगळुरूचा संघ आठ विजय आणि सहा पराभवानंतर 14 सामन्यांतून 16 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पण त्यांचा रन रेट हा -0.253 आहे. त्याचवेळी दिल्ली सात विजय आणि सहा पराभवानंतर १३ सामन्यांत १४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट रन रेट प्लसमध्ये आहे, जो +0.255 आहे. अशा परिस्थितीत दिल्लीने आज मुंबईवर मात केल्यास प्लस नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मुंबईने आपला मागील सामना सनरायझर्स हैदराबादकडून 3 धावांनी गमावला होता. संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर पडला आहे आणि लीग टप्प्यातील त्यांचा हा शेवटचा सामना आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान/पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स: इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार),तिलक वर्मा, डॅनियल सॅम्स, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.