आयपीएल 2023 पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती Kieron Pollard Retirement घेतली आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सने पोलार्डला या मोसमाच्या लिलावापूर्वी सोडल्याची बातमी आली होती. 12 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर पोलार्डला मुंबईने सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. निवृत्तीसाठी, पोलार्डने एक मोठी पोस्ट लिहिली आहे.
💙 #OneFamily @mipaltan pic.twitter.com/4mDVKT3eu6
— Kieron Pollard (@KieronPollard55) November 15, 2022
किरॉन पोलार्डने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्ससाठी लिहिले की, ‘मला आणखी काही वर्षे खेळायचे असल्याने हे ठरवणे सोपे नव्हते, परंतु मुंबई इंडियन्सशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या आयपीएल कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सला बदल हवा आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळू शकत नाही, तर मी स्वतःला मुंबईविरुद्ध खेळतानाही पाहू शकत नाही. मी कायम मुंबई इंडियन्सचा राहीन.
पोलार्डने आपली संपूर्ण कारकीर्द मुंबईसोबत घालवली आणि 171 डावात 3412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीचा स्ट्राइक-रेट 147.32 होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एक दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डची गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी झाली. गेल्या मोसमात त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता.