
युएईमध्ये होणाऱ्या टी-20 लीगमध्ये (UAE T-20 League) मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा MI एमिरेट्स संघ सहभाग घेणार आहे. या संघाने त्यांच्या स्क्वॉडमध्ये 14 खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डसह (Kieron Pollard) अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि युएईमध्ये होणाऱ्या टी-20 लीगसाठी मुंबई इंडियन्सने संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये MI केपटाऊन आणि युएईमध्ये MI एमिरेट्सचा संघ मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीचा भाग असणार आहे.
युएई टी-20 लीगसाठी मुंबई इंडियन्सच्या MI एमिरेट्सने अनेक खेळाडूंना साईन केलं आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या एमिरेट्सच्या माध्यमातून शुक्रवारी याबाबतची माहिती देण्यात आली आहे. संघाने आतापर्यंत 14 खेळाडूंचा समावेश करुन घेतला आहे. यामध्ये चार खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. तर तीन खेळाडू इंग्लंडचे, तीन अफगानिस्तान, एक स्कॉटलॅंड, एक नेदरलॅंड, एक-एक खेळाडू दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडचा सामील केला आहे.
Representing @MIEmirates at the IL T20 🇦🇪
Read more – https://t.co/XjRmpaAoEl#MIemirates #OneFamily @EmiratesCricket pic.twitter.com/V5nbQWD0FJ
— MI Emirates (@MIEmirates) August 12, 2022
मुंबई इंडियन्सचा संघ – कायरन पोलार्ड ( वेस्टइंडीज ), ड्वेन ब्राव्हो ( वेस्टइंडिज ), निकोलस पूरन ( वेस्टइंडिज ), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड ), आंद्रे फ्लेचर ( वेस्टइंडिज ), इमरान ताहिर ( दक्षिण आफ्रिका ), समित पटेल ( इंग्लंड ), विल स्मीद (इंग्लंड ), जॉर्डन थॉम्पसन ( इंग्लंड ), नजीबुल्लाह जादरान ( अफगानिस्तान ), जहीर खान (अफगानिस्तान ), फजलहक फारुकी ( अफगानिस्तान ), ब्रेडली व्हील ( स्कॉटलॅंड ), बैस डे लीडे ( नेदरलॅंड्स )