आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी खराब राहिली आहे. त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. उद्या (21 एप्रिल रोजी) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स प्रथमच IPL 2022 मध्ये आमनेसामने येतील.
आज मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करत होते. त्यावेळी मधमाशांनी खेळाडूंवर हल्ला केला. याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये मुंबई संघाचे खेळाडू मैदानावर मधमाशांचे थवे आल्यानंतर मैदानात झोपलेले दिसतात. खेळाडूंनी झोपून मधमाश्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवले.
To bee or not to bee in training was a question yesterday! ????????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/qaTaHjjca6
— Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2022
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला सलग 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबई संघाचे गोलंदाज अतिशय खराब फॉर्ममध्ये झुंजत आहेत. विकेट घेणे तर दूरच, ते धावाही रोखण्यात अपयशी ठरत आहेत. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. सूर्यकुमार यादव वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाहीय.