मुंबईचा संघ नव्या भिडूंसह उतरणार मैदानात, अशी आहे मुंबईची नवी ‘पलटण’

WhatsApp Group

आयपीएल 2022 च्या मोसमासाठीचा IPL Auction 2022 दोन दिवसांचा लिलाव संपला आहे. आयपीएलच्या या लिलावामध्ये सगळ्या 10 संघांनी पाण्यासारखे पैसे खर्च केले. तर इशान किशन Ishan Kishan हा या लिलावातील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने Mumbai Indians 15.25 कोटींची बोली लावली.

RCB चा नवा संघ विराटचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणार? पाहा RCB चा संपूर्ण संघ

त्यानंतर मुंबई इंडियन्सने सिंगापूरच्या टीम डेव्हिडला Tim David तब्बल 8.25 कोटी रुपये खर्च करून विकत घेतले. इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरवर Jofra Archer बोली लावून मुंबई इंडियन्सने अनेकांनाच धक्का दिला. जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्स 8 कोटी रुपये देऊन विकत घेतले.


आर्चर फिट नसल्यामुळे आयपीएलचा हा मोसम तो खेळणार नाही. दुखापतग्रस्त असल्यामुळे आर्चरने आयपीएल लिलावासाठी स्वत:च्या नावाचीही नोंदणीही केली नव्हती, पण शेवटच्या क्षणी आर्चरने स्वत:चे नाव ऑक्शन लिस्ट मध्ये टाकले. आर्चरने दुखापतीनंतरही नाव दिले, त्यामुळे जी टीम आर्चरला विकत घेईल त्यां संघाला बदली खेळाडू मिळणार नाही, असे बीसीसीआयने BCCI आधीचं स्पष्ट केले होते. तरीदेखील मुंबईच्या संघाने भविष्याचा विचार करत आचर्रवर बोली लावली.

IPL Mega Auction: लियम लिविंगस्टोनला 11.50 कोटींची बोली तर इयॉन मार्गन अनसोल्ड!

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ Mumbai Indians Full Squads
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल,अनमोलप्रीत सिंग, अर्जुन तेंडुलकर, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान,जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, बसील थंपी, मयंक मार्कंडे, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन.

हेही वाचा

 ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम