महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबई इंडियन्ससाठी हरमनप्रीत कौरने शानदार अर्धशतक झळकावत सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने 4 गडी गमावून 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ अवघ्या 64 धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईच्या विजयात हरमनप्रीत कौरचे महत्त्वाचे योगदान होते. या सामन्यात हरमनप्रीत कौरने 216.67 च्या स्ट्राईक रेटने केवळ 30 चेंडूत 65 धावा केल्या. यादरम्यान तिने 14 चौकारही मारले. या खेळीसाठी तिला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
View this post on Instagram