Mumbai Indians: आयपीएल 2023 सुरू होणार आहे, पण मुंबई इंडियन्सच्या अडचणी काही संपत नाहीत. आयपीएल 2023 आधी मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हंगामातील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2023 सीझनचे काही सामने खेळणार नाही. मात्र, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार असेल
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, व्यवस्थापनाने कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मा दुखापतग्रस्त नसून, कामाचा ताण सांभाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. या संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय झ्ये रिचर्डसन दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. अशा स्थितीत गोलंदाजी विभाग मुंबई इंडियन्ससाठी अडचणीचा ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा शेवटचा हंगाम अत्यंत निराशाजनक होता. संघ सलग 8 सामने गमावला होता आणि गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर होता. सीझनमध्ये सलग 8 सामने गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या विजयाची चव चाखली होती.
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त वेळा आयपीएल ट्रॉफी कोणत्याही संघाने जिंकलेली नाही. मुंबई इंडियन्सनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रोहित शर्माने 2013 साली पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2015, आयपीएल 2017, आयपीएल 2019 आणि आयपीएल 2020 जिंकले.