IPL 2022 : मुंबईच्या पलटणचा गुजरातवर 5 धावांनी दणदणीत विजय

WhatsApp Group

IPL 2022 चा 51 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 6 गडी गमावून 177 धावा केल्या होत्या. गुजरातला विजयासाठी178 धावांचे आव्हान मुंबईने दिले होते. मात्र हे आव्हान गुजरातला पार करता आले नाही. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने हा सामना 5 धावांनी जिंकला. या मोसमातील मुंबईचा हा दुसरा विजय आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा शानदार फलंदाजी करत 28 चेंडूत 43 धावा करत बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव 11 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. प्रदीप सांगवानने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. सलामीवीर इशान किशन 29 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. किरॉन पोलार्ड14 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा 16 चेंडूत 21 धावा करत माघारी परतला.

प्रत्युतरात  गुजरात टायटन्स संघाकडून वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने धकाडेबाज फलंदाजी केली. शुभमन गिल 36 चेंडूत 52 धावा करत माघारी परतला.  त्यामागोमाग वृद्धीमान साहा 40 चेंडूत 55 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर साई सुदर्शन 11 चेंडूत 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करणारा राहुल तेवतीया 4 चेंडूत 3 धावा करत तंबूत परतला. गुजरातला 20 षटकांत फक्त 172 धावा करता आल्या. मुंबई हा सामना 5 धावांनी जिंकला असून मुंबईचा हा या मोसमातील दूसरा विजय आहे.

मुंबईकडून गोलंदाजी करताना मुरुगन अश्विनने 4 षटकांत 29 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. कीरोन पोलार्डने 2 षटकांत 13 धावा देत 1 विकेट्स घेतली. तर गुजरातकडून गोलंदाजी करताना राशीद खानने 4 षटकांत 24 धावा देत 2 विकेट्स घतले. प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.