IPL 2022: अटीतटीच्या सामन्यात मुंबईने मारली बाजी, सीएसकेच्या प्ले-ऑफच्या स्वप्नांना सुरूंग

WhatsApp Group

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59वा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाची पुरती दुर्दशा झाली आहे.

चेन्नई संघ फक्त 97 धावा करु शकला. मुंबईला विजयासाठी 98 धावांचे सहज गाठता येईल असे आव्हान चेन्नईने दिले होते. मुंबईने हे आव्हान 14.5 षटकांत पूर्ण केले. मुंबईने 5 गडी राखून या सामन्यात विजय मिळवला. मुंबईचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे. मुंबईच्या या विजयामुळे चेन्नईच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या परभवामुळे चेन्नई प्ले ऑफच्या बाहेर पडला आहे.

सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन मुंबई संघाने दमदार सुरुवात केली होती. मुंबई संघाने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. डेवॉन कॉन्वे आणि मोई अली शून्यावर बाद झाले. ऋतुराज गायकवाड 6 चेंडूत 7 धावा करत तंबूत परतला. रॉबिन उथप्पा फक्त 1 धावा करत बाद झाला.

त्यानंतर अंबाती रायुडू 14 चेंडूत 10 धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनीने दमदार फटकेबाजी सुरू ठेवली. जोरदार फटकेबाजी करना शिवम् दुबे 9 चेंडूत 10 धावा करत बाद झाला. धोनीने 33 चेंडूत 36 धावा करत नाबाद राहिला. 16 षटकांत मुकेश चौधरी धावबाद झाला. 97 धावांवर चेन्नईचा पूर्ण संघ तंबुत परतला.मुंबईला विजयासाठी 98 धावांची गरज होती.

मुंबईकडून गोलंदाजी करताना डेनिएल सैम्सने 4 षटकांत सर्वाधिक 3 बळी घेतले. कुमार कार्तिकेय आणि रिले मेरेडिथ यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.  जसप्रीत बुमराह आणि रमनदीप सिंह यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

मुंबईकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा 14 चेंडूत 18 धावांवर बाद झाला. ईशान किशन 6 धावांवर माघारी परतला. डेनिएल सैम्स 6 चेंडूत फक्त 1 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋतिक शौकीन 23 चेंडूत 18 धावा करत बाद झाला. तिलक वर्मा 32 चेंडूत 34 धावा करत नाबाद राहिला. मुंबईने 5 गडी राखून या सामन्यात विजय मिळवला. मुंबईचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे.

मुंबई इंडियंसचा संघ – ईशान किशन, रोहित शर्मा, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनिएल सैम्स, ऋतिक शौकीन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

चेन्नई सुपर किंग्सचा संघ – ऋतुराज गायकवाड़, डेवोन कॉनवे, मोइन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम् दुबे, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा