नितेश राणेंना अटक होणार की नाही? कोर्टाने दिला मोठा निर्णय

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तेथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. तर याच प्रकरणात आरोपीचा ठपका ठेवण्यात आलेल्या मनीष दळवींना  न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

जामीन फेटाळण्यात आला असला तरी नितेश राणेंना न्यायालयाने दिलासा देत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 10 दिवसांची मुदत दीली आहे. त्यामुळे नितेश राणेंना 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

१८ डिसेंबरला शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परब सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या गोटातले असल्यानं या घटनेला राजकीय वळण लागलं. याप्रकरणी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह ४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आमदार नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीही झाली होती. तेव्हापासूनच नितेश राणे नॉट रिचेबल होते मात्र जिल्हा बँकचे अध्यक्षपदाची निवडणूक झाली तेव्हा ते सिंधुदुर्ग बँकेत दिसले होते.