‘…लाऊड स्पीकर जप्त करा’, मशिदींवरील भोंग्यांवरुन मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

WhatsApp Group

मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत मुंबई हायकोर्टानं मोठा निकाल दिला आहे. मशिदीवरील लाऊड स्पिकरच्या आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी याची दखल घ्यावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आधी समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास लाऊड स्पीकर जप्त करा, अशी सूचना न्यायालयानं दिली आहे.