Reel Star Aanvi Kamdar: रीलचा नाद महागात! मुंबईची रील स्टार अन्वी कामदारचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू

WhatsApp Group

मुंबई : इंस्टाग्रामवर तिच्या ट्रॅव्हल पोस्टमुळे चर्चेत असलेली अन्वी कामदार हिचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळील रायगडमध्ये 300 फूट खोल दरीत पडून अन्वीचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. या आवडीला तिनं आपलं करिअर बनवलं होते. रायगडमधील कुंभे धबधब्याचा रील्स बनवत असताना अन्वीचा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्यात तिचा मृत्यू झाला.

अन्वी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अन्वी कामदार पावसाळ्यात कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी आली होती.

नेमकं काय झालं ?

अन्वी आणि तिच्या मित्रांचा, सात जणांचा हा ग्रुप फिरायला गेला. तेथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती. मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला अन् ती ३०० फूट खोल दरीत कोसळली. यावेळी तिच्यासोबत तिचे सहा सहकारी देखील होते. पण, कोणालाही धोक्याबाबत तिला सूचना देता आली नाही. घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरु केली. दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.