Mumbai terror attacks: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला अटक, पाकिस्तान सरकारकडून मृत्यू झाल्याचा दावा

नवी दिल्ली – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai terror attacks) सूत्रधार साजिद मीर (master mind Sajid Mir ) याला पाकिस्तानने अटक (pakistan arrest sajid mir) केली आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी (labor) न्यायालयाने साजिद मीरला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा (lashkar a Tayyab) दहशतवादी साजिद मीर याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणामध्ये देण्यात आली आहे.
साजिद मीर हा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतला एक महत्वाचा दहशतवादी आहे. पाकिस्तानने वारंवार साजिद मीर पाकिस्तानमध्ये नसल्याचे सांगितले होते. त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तान सरकारकडून करण्यात आला होता. दरम्यान साजिदला ताब्यात घेऊन पाकिस्तानला दहशतवादाचा डाग पुसायचा आहे, असं बोलले जात आहे.
साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात सुमारे 170 लोक मारले गेले. भारत जवळपास 12 वर्षांपासून त्याचा शोध घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.