मुंबईचा ‘हा’ स्टार खेळाडू बनला ‘बाबा’; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

WhatsApp Group

T20 विश्वचषक 2024 च्या गट टप्प्यातील शेवटचा सामना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. वेस्ट इंडिजने हा सामना 104 धावांनी जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू रोमारिओ शेफर्ड खेळताना दिसला नाही.

शेफर्डची पत्नी टिया टेरेन्सा जोसेफ हिने आज दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे शेफर्डला त्याच्या घरी परतावे लागले. त्याला आधीच एक मुलगा आहे. त्याच्या मुलाचे नाव रोमुआल्डो शेफर्ड आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर सांगितले की, तो 18 जून रोजी पुन्हा संघात सामील होणार आहे.

वेस्ट इंडिज संघाने रोमारियो शेफर्डच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयला घेतले होते. याशिवाय वेस्ट इंडीजने रोस्टन चेसच्या जागी शाई होपला संधी दिली.