Mumbai 26/11 Attacks: आजच्याच दिवशी मुंबई शहर हादरले होते, 15 वर्षांपूर्वी काय घडलं होत मुंबईत, वाचा…
Mumbai 26/11 Attacks: 26/11 मुंबई हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता जेव्हा संपूर्ण देश मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने होरपळला होता. आजपासून 15 वर्षांपूर्वी मुंबईत काय घडले होते वाचा..
26 नोव्हेंबर 2008 ची ती संध्याकाळ हादरवून टाकणारी होती. दररोजच्या संध्याकाळप्रमाणे ती संध्याकाळ गुंजत होती मात्र अचानक गोळ्यांच्या आवाजाने शहराचा परिसर हादरला. दहशतवाद्यांकडून या गोळ्या झाडल्या जात आहेत, याची कुणालाही कल्पना नव्हती. मुंबई हल्ल्याची सुरुवात लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून झाली. हा हल्ला एवढा मोठा असू शकतो, याची कोणालाच कल्पना नव्हती. पण हळूहळू मुंबईच्या इतर भागातून बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या बातम्या येऊ लागल्या. रात्रीपर्यंत झालेल्या हल्ल्याचा परिणाम दिसू लागला.
मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अश्या प्रकारचा हल्ला होईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. मोठ्या संख्येने स्थानकावर प्रवासी होते. दोन दहशतवादी तिथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि हँडग्रेनेडही फेकले. त्यामुळे 58 निष्पाप प्रवासी मृत्यूच्या कचाट्यात सापडले. तर चेंगराचेंगरीत अनेक जण गोळी लागल्याने जखमी होऊन पडले. अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान नावाच्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता.
VIDEO | Mumbai terror attacks: Tributes paid to martyrs at police headquarters in Mumbai on 15th anniversary of 26/11.#MumbaiTerrorAttack pic.twitter.com/OPJgxT1BxO
— Press Trust of India (@PTI_News) November 26, 2023
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाशिवाय दक्षिण मुंबईतील ताज हॉटेल, हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले सुरू केले. मध्यरात्रीपर्यंत मुंबईतील अनेक भागात हल्ले होत होते. शहरात चार ठिकाणी चकमक सुरू होती. पोलिसांशिवाय लष्करी दलही मैदानात उभे होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले झाले त्यामुळे धक्का बसला होता. त्यामुळे दहशतवाद्यांच्या संख्येचा अंदाज बांधणे कठीण होत होते.
26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी ताज हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला. येथे दहशतवाद्यांनी सात परदेशी नागरिकांसह अनेक लोकांना आपल्या ताब्यात ठेवले होते. नंतर ताज हॉटेलच्या हेरिटेज विंगला आग लागली. 27 नोव्हेंबरला सकाळी एनएसजीचे कमांडो दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पोहोचले होते. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी हॉटेल ओबेरॉयमधील पोलिसांची सुटका करून ऑपरेशन संपले आणि त्याच दिवशी नरिमन हाऊसमध्ये असलेले दहशतवादी देखील मारले गेले होते. मात्र ताज हॉटेलचं ऑपरेशन पार पाडण्यासाठी 29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत वेळ लागला.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये दहशतवादी अजमल अमीर कसाब याला तारदेव परिसरात जिवंत पकडण्यात यश आले. अजमल अमीर कसाब मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. त्यानंतर त्याने पाकिस्तानचा दहशतवादी कारस्थान उघड केला होता. मारले गेलेल्या त्याच्या साथीदारांची नावे त्याने उघड केली होती. नंतर कसाबवर खटला चालवला गेला आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.
या हल्ल्यात अनेक दहशतवादी सामील असू शकतात असे वाटतं होतं. मात्र हल्ला झाल्यानंतर आणि कसाबला पकडल्यानंतर हे काम करण्यासाठी दहा दहशतवादी तयार करण्यात आले. त्यांना पाकिस्तान मध्ये दहशतवादयांकडून प्रशिक्षण दिले जात होते, ते दहा दहशतवादी 26 नोव्हेंबरला समुद्रातून बोटीने भारतात घुसले होते. त्यांची जळालेली बोटही पोलिसांनी जप्त केली होती.
मुंबई हल्ल्यात दहशतवादी पोलिस व्हॅनमध्ये बसून रस्त्यावर गोळ्या झाडत होते. यावेळी त्यांनी एका टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनला गोळ्या घातल्या. त्यानंतर दहशतवादी व्हॅन घेऊन कामा रुग्णालयात घुसले. त्याचवेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एसआय अशोक कामटे आणि विजय साळसकर हे चकमकीत शहीद झाले. मुंबईत झालेला हा भयंकर हल्ला हाणून पाडण्यासाठी दोनशे एनएसजी कमांडो आणि लष्कराचे पन्नास कमांडो पाठवण्यात आले होते.