Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना; असा करा अर्ज
महाराष्ट्रातील मुली व महिलांना आता दर महा 1500 रू मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत मुली व महिला यांना मदत व्हावी यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत. तर या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” साठी अर्ज कसा करावा?, अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, तसेच या योजनेसाठी कोणत्या मुली व महिला अर्ज करू शकता?, या योजनेसाठी वयाची अट काय आहे? तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? अर्ज करण्याची वेबसाईट कोणती? अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
लाडकी बहिण योजना काय आहे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार की नई योजना-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन।
इस योजना के तहत महाराष्ट्र की सभी महिलाओं के खाते में हर महीने 1500 रूपये डाले जाएँगे।
यह योजना इसी साल अगले महीने यानी जुलाई महीने से लागू हो रही है।
दो-तीन दिनों में सभी माताओं और बहनों के दरवाज़े पर ख़ुशियाँ ही…— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 28, 2024
माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितींना चालना देणे.
- त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना मिळणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा करणे.
माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण आहेत.
महाराष्ट्रात नवीन सुरू झालेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला लाभार्थी राहणार आहेत.
पात्रता काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे? त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
- राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यकत्या आणि निराधार महिला.
- महिलेचे कमीत कमी वय 21 वर्षे पूर्ण असावे तर जास्तीत जास्त 60 वर्षेपर्यंत
- या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असावे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
2. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
4. कुटुंबाचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे)
5. बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
6. पासपोर्ट साईज फोटो.
7. रेशन कार्ड.
8. सदर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल. तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल.
तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल. कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल तसेच ही केवायसी करण्यात येईल. यासाठी महिलेने खालील आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
वयाची अट काय आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी वयाची अट काय आहे? पाहूया तर महिला व मुलींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट देण्यात आलेली आहे. तर अर्जदार महिलेचे वय अर्ज करता वेळी कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती
तर लाडली बहण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ते पाहूया. तर 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयात दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तसेच शासनाने वेळोवेळी तारखेत जर का बदल केला तर त्याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट वरती अपडेट करण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
- योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
- लाभार्थ्यांचं आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
- पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र