
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मीडिया स्टेटमेंटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, ईशा आणि आनंद पिरामल यांना जुळी मुलं झाली आहेत मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया असे सांगण्यात आले असून दोघेही निरोगी आहेत.
2018 मध्ये, ईशा अंबानीने हेल्थकेअर बिझनेस ग्रुप पिरामलचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचा देशातील सर्वात महागड्या लग्नांच्या यादीत समावेश आहे, ज्यामध्ये देशातील, बॉलिवूड आणि जगभरातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.