Mukesh Ambani: अदानींना मागे टाकत मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

WhatsApp Group

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे ३ जून रोजी शेअर्समध्ये आलेल्या विक्रमी तेजीनंतर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार, मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, अंबानी यांची एकूण संपत्ती ९९.७ अब्ज डॉलर एवढी आहे. २०२२ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत ९.६९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या स्थानी आहेत. तर गौतम अदानी हे ९८.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या स्थानी आहेत.

टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) हे २२७ अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेजोस हे १४९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत.