अदानी ठाकरेंना भेटल्यानंतर आता मुकेश अंबानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

WhatsApp Group

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी हे दोघे शनिवारी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीचे कारण मात्र समोर आले नाहीय. या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दीर्घकाळ चर्चा झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच मुकेश अंबानी हे थेट वर्षा बंगल्यावर पोहोचल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. देशातील दोन आघाडीचे उद्योगपती काही दिवसांच्या अंतराने प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना का भेटले असावेत, ही शंका उपस्थित झाली आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा