
मुंबई – आधीच महागाईची झळ सहन करत असलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक झटका बसला आहे. महावितरणने (Mahavitaran) वीजेच्या दरात वाढ (Electricity) प्रति युनिट 25 पैशांची वाढ करत ग्राहकांना झटका दिला आहे. वीज दरवाढीसाठी महावितरणने एफएससी म्हणजेच इंधन समायोजन शुल्कचा आसरा घेतला आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या शुल्कामुळे विजेच्या दरात प्रति युनिट 5 ते 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे.