Maharashtra SSC Result: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज नाही; विद्यार्थी, पालकांचे लक्ष निकालाच्या तारखेकडे

Maharashtra SSC Result : महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल देखील अपेक्षित वेळेआधी जाहीर होईल अशी आस विद्यार्थी, पालकांना लागली आहे. दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सकडून 15 जूनला दहावीचा निकाल लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र राज्य शिक्षणमंडळाने आज 15 जून दिवशी निकाल जाहीर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच अधिकृत निकालाची तारीख जाहीर करून तो प्रसिद्ध केला जाईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे.