मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बांधले जाणार एमएस धोनीचे स्मारक

WhatsApp Group

IPL 2023 चा 12 वा सामना 8 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाईल. एमएस धोनीचा (MS Dhoni) संघ या मोसमात एक विजय आणि एक पराभवासह दोन गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचे वानखेडे क्रिकेट स्टेडियम हे धोनीसाठी अविस्मरणीय स्टेडियम आहे. 12 वर्षांपूर्वी याच मैदानावर 2011 क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये षटकार मारून माहीने भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.

या ऐतिहासिक स्टेडियममध्ये धोनीला आता विशेष सन्मान मिळणार आहे. खरे तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) चेन्नई आणि मुंबई यांच्यातील IPL सामन्यादरम्यान धोनीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या विजयी षटकाराची जागाही MCA राखीव ठेवेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ज्या स्टँडवर चेंडू पडला त्याच जागेवर स्मारक बांधण्याचा (Memorial at Wankhede Cricket Stadium) निर्णय घेतला आहे.

एमसीएने ट्विटरवर दिली माहिती 

एमसीएने मंगळवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे आणि सचिव अजिंक्य नायक यांनी सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांसह एमएस धोनीच्या 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये एमसीए पॅव्हेलियनमध्ये विजयी षटकार मारल्याच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती क्रिकेट संघटनेने दिली. या मैदानावर षटकार मारून धोनीने 28 वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता.

एमसीएच्या अध्यक्षांनी एनएनआयला सांगितले की, “2011 च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वानखेडे स्टँडवर एक स्मारक बांधले जाईल, असा एमसीए सर्वोच्च परिषदेने निर्णय घेतला आहे. धोनीचा विजयी षटकार ज्या स्टँडवर पडला होता, तिथे हे स्मारक बांधले जाणार आहे. आम्ही धोनीला स्वतः स्मारकाचे उद्घाटन करण्याची विनंती करू.”