कोलकाताचा पराभव करत चेन्नई चौथ्यांदा बनली IPL चॅम्पियन

IPL 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नईचा कोलकातावर 27 धावांनी विजय

WhatsApp Group

दुबई – कोलकाताविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या IPL 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने (Chennai Super Kings) 27 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा IPL चं विजेतेपद मिळवलं आहे. यापूर्वी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी बाद फेरीही न गाठणारा चेन्नईचा संघाने यंदा विजेतेपद मिळवून अनेकांना धक्का दिला आहे. चेन्नईने केलेल्या या जोरदार कमबॅकमुळे धोनीच्या (MS dhoni) नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा आणि कौतुक होताना दिसत आहे.


या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा केल्या होत्या. चेन्नईसाठी दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) 59 चेंडूत 86 धावांची वादळी खळी केली. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. प्लेसिसव्यतीरीक्त ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 32, रॉबिन उथप्पाने 31 आणि मोईन अलीने 37 धावांची खेळी केली. कोलकातासाठी गोलंदाजीत सुनील नरेन २ तरशिवम मावीने 1 विकेट घेतला.

चेन्नईने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने दमदार सुरुवात केली. केकेआरच्या सलामी जोडीने दमदार फलंदाजी करत पहिल्या 10 षटकात बिनबाद 88 धावा केल्या होत्या. व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) 32 चेंडूत 50 तर शुबमन गिलने (Shubman Gill) 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. मात्र हे दोघे माघारी परतल्यानंतर कोलकाताच्या एकाही फलंदाजाला आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करता आली नाही. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 3 , जोश हेझलवुड आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 तर चहार आणि ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट पटकावला.

संक्षिप्त धावफलक:

चेन्नई 192/3 (फाफ डू प्लेसिस 86, मोईन अली 37*; सुनील नरेन 2-26)
कोलकाता 165/9 (शुभमन गिल 51, व्यंकटेश अय्यर 50; शार्दुल ठाकूर 3-38)

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघाची ‘प्लेइंग XI’

कोलकाता – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, ओएन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई – ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, दीपक चाहर, जोश हेजलवुड.