“निवृत्तीची वेळ आली आहे पण…”, ट्रॉफी जिंकल्यानंतर एमएस धोनीची मोठी घोषणा

0
WhatsApp Group

आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याला प्रत्युत्तरात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना लांबला. त्यामुळे चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला.

अंतिम फेरीत गुजरात टायटन्सवर पाच गडी राखून विजय मिळविल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला विचारण्यात आले की हा त्याचा शेवटचा हंगाम आहे का? तो म्हणाला की, परिस्थिती बघितली तर माझ्यासाठी निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. मी आता सोडतोय हे सांगणे माझ्यासाठी खूप सोपे आहे पण पुढचे नऊ महिने कठोर परिश्रम करून परत येऊन आणखी एक हंगाम खेळणे कठीण आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात खाते न उघडता बाद झाला असावा. पण आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावणारा तो कर्णधार बनला आहे.त्याने आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माची बरोबरी केली आहे. विजेतेपदाचा सामना जिंकल्यानंतर धोनी पोस्ट प्रेझेंटेशन दरम्यान म्हणाला, पुढील आयपीएलबाबत उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. धोनीनं सांगितलं की, चाहत्यांनी भरभरून दिलेलं प्रेम पाहता आता निवृत्तीबाबत काही बोलणं चुकीचं ठरेल. मला त्यांच्या प्रेमाची परफेड करायची आहे.

चाहते माझ्यासोबत जोडले गेले आहे, हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे. आजही चाहत्यांचं प्रेम पाहून माझे डोळे पाणावले. मलाही त्यांना एक भेट द्यायची आहे. आणखी एक आयपीएल हंगाम खेळणं माझ्यासाठी सोपं जाणार नाही, पण मी खूप मेहनत करुन पुढच्या हंगामात परतण्याचा प्रयत्न करेन. असं धोनी म्हणाला.