महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या चमकदार खेळीसाठी आणि मैदानाबाहेर साधे जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. धोनीने त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत होता, ज्याला पाहून सर्वांनी माहीचे कौतुक केले. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, माजी भारतीय कर्णधार धोनी सूटमध्ये दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार हुक्का ओढताना दिसला. धोनीने आधी हुक्का तोंडात घातला आणि धूर आत घेतला आणि नंतर तो धूर बाहेर काढताना दिसला. धोनीच्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे अनेकांनी माजी भारतीय कर्णधाराला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Herbal shisha hay! It’s good for health and contains no tobacco 👍🏼
Stop trolling MS Dhoni! He’s a legend. Rival fans should stay away from Mahi ❌ pic.twitter.com/F1SjaEY7ya
— Farid Khan (@_FaridKhan) January 6, 2024
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू जॉर्ज बेलीने एकदा खुलासा केला होता की एमएस धोनी तरुणांसोबत संबंध निर्माण करण्यासाठी हुक्का सेशन करायचा. बेली हा 2009 ते 2012 दरम्यान CSK संघाचा भाग होता आणि 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचाही भाग होता.
या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, “माहीची इच्छा.” दुसर्या युजरने लिहिले, “माही भाई आधीच आयपीएल जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी करत आहे. लोकांनी व्हिडिओवर अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Mahi ki Marzi Jo mrzi kry!
— Ahmed Pirzada (@joinpirzada) January 6, 2024
Jeeny do bhai use.
— ishmal || babar stan|| (@lostie_x) January 6, 2024
चेन्नई सुपर किंग्सने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल 2023 मध्ये विजेतेपद पटकावले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ 2023 मध्ये पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. धोनीने संपूर्ण हंगामात संघासाठी काही शानदार फिनिशिंग इनिंग खेळल्या होत्या, ज्याने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.
धोनीची आयपीएल कारकीर्द
एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 250 आयपीएल सामने खेळले आहेत, 218 डावात फलंदाजी करताना त्याने 38.79 च्या सरासरीने आणि 135.92 च्या स्ट्राइक रेटने 5082 धावा केल्या आहेत. या काळात चेन्नईच्या कर्णधाराने 24 अर्धशतके झळकावली आहेत.