महेंद्रसिंग धोनीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण त्याची क्रेझ आजही क्रिकेटप्रेमींमध्ये आहे, कारण धोनीची बॅट हलली की गोलंदाज लेन्थ आणि लाइन विसरतात. विशेष म्हणजे एमएस धोनीबद्दल एक मोठी बातमी आहे, जी ऐकून त्याचे चाहतेही खूश होतील. महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2023 ची तयारी सुरू केली आहे, यावेळीही तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये धोनीने 2023मध्येही आयपीएल खेळणार असल्याचे संकेत दिले होते. पण यावेळी धोनीऐवजी दुस-याला चेन्नईचा कर्णधार केला जाऊ शकतो. मात्र धोनीच संघाचा कर्णधार असेल अशी देखील चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत त्याने सराव सुरू केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी नेटवर सराव करताना दिसत आहे, त्यादरम्यान तो सर्व शॉट्स खेळताना दिसत आहे, धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. सोबत तो एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे, ज्याने आपल्या बॅटच्या जोरावर सीएसकेसाठी आतापर्यंत अनेक मोठे सामने जिंकवले आहेत. हेही वाचा – साराच्या नावाने चिडवताचं गिलने दिली मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO झाला व्हायरल
The preparation has started for MS Dhoni ahead of IPL 2023. pic.twitter.com/FUapARmL4P
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 19, 2023
चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रेंचाइजीने माहीच्या कर्णधारपदाला मान्यता दिली आहे. सीएसकेने आयपीएल मिनी लिलावात बेन स्टोक्सवर मोठी रक्कम खर्च करून बेन स्टोक्सचा आपल्या संघात समावेश केला होता, त्यामुळे तो सीएसकेचा कर्णधारही होऊ शकतो अशी चर्चा होती, परंतु सीएसकेने धोनीच कर्णधारपद सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले. चेन्नई टीमचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली. सीएसकेने एका मीडिया वाहिनीशी केलेल्या संवादात माहिती दिली आहे की, चेन्नई संघाची कमान फक्त धोनी सांभाळणार आहे. हेही वाचा – iPhone Offer: फक्त 12,200 रुपयांमध्ये iPhone खरेदी करण्याची संधी!
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार
महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनी 2008 पासून चेन्नईचे नेतृत्व करत आहे, त्याने संघाला चार वेळा आयपीएल ट्रॉफीही जिंकून दिली आहे. यावेळी क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशी चर्चा होती की धोनीच्या जागी चेन्नई भविष्यानुसार आणखी कोणाला तरी कर्णधार बनवू शकते, परंतु तसे होणार नाही कारण यावेळीही फक्त धोनीच कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.