भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी गुडघेदुखीवर घेतोय 40 रुपयाचे आयुर्वेदिक औषध

WhatsApp Group

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या गुडघेदुखीने त्रस्त आहे. धोनी ही समस्या दूर करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर झारखंडची राजधानी रांचीजवळील एका गावात झाडाखाली जाऊन एका वैद्याकडून उपचार करून घेत आहे. हे वैद्य परंपरेने रूग्णांवर जंगली औषधी वनस्पतींच्या मदतीने उपचार करतात. औषधाच्या डोससाठी ते प्रत्येक रुग्णाकडून फक्त 40 रुपये घेतो.  तेवढीच रक्कम त्यांनी धोनीकडूनही घेतली आहे.

रांचीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या लापुंगच्या गलगली धाममध्ये देशी गाईचे दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून औषधे बनवली जातात. महेंद्रसिंग धोनी येथे 4 वेळा आला आहे आणि त्याचा डोस घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी लापुंग येथील देशी गाईचे दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून बनवलेले औषध पीत आहे. असं सांगण्यात येत आहे की, महेंद्रसिंग धोनी त्याच्या आई-वडिलांनीही येथूनच डॉक्टरवर उपचार करून घेतले आहे. झारखंड व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि छत्तीसगड येथूनही लोक उपचारासाठी येथे येत असतात.

वैद्य बंदनसिंह खेरवार यांच्याकडून औषधे घेण्यासाठी अनेक राज्यातून लोक येथे येतात. वैद्य यांचे औषध खाल्ल्यामुळे धोनीला मोठा दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्य बंदन सिंह खेरवार यांनी सांगितले की धोनी सामान्य रुग्णाप्रमाणेच येथे येतो आणि त्याचे औषध घेतो. त्याच्यात मोठा माणूस असल्याचा कोणताही अभिमान नाही. धोनी येथे आल्याची बातमी ऐकून चाहत्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती.