
महेंद्रसिंग धोनी चेन्नईला पोहोचला, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते विमानतळावर उपस्थित होते. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपट ‘लेट्स गेट मॅरीड’ च्या ऑडिओ आणि ट्रेलर लॉन्चसाठी येथे आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच सिनेमा असेल. धोनीने तीन दिवसांपूर्वी आपला 42 वा वाढदिवस साजरा केला होता.
धोनी चेन्नईमध्ये नव्या रुपात दिसला. धोनी विमानतळावर येतानाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन पेजने शेअर केला आहे. या फॅन पेजच्या माध्यमातून धोनी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या पहिल्या चित्रपटाच्या ऑडिओ आणि ट्रेलर लाँचसाठी चेन्नईला पोहोचल्याची माहिती देण्यात आली. विमानतळावर चाहत्यांनी धोनीचे मोठ्या थाटात स्वागत केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये धोनीची पत्नी साक्षीही त्याच्यासोबत दिसल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, ट्रेलर लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो 10 जुलै, सोमवार रोजी असेल आणि या लॉन्चमध्ये धोनीची पत्नी साक्षी देखील उपस्थित असेल. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हरीश कल्याण, इवाना, नाधिया, योगी बाबू आणि मिर्ची विजय हे कलाकार यात दिसणार आहेत.
Thala Dhoni in Chennai for the Audio and Trailer launch of his first production Movie LGM 💛#MSDhoni #LGM pic.twitter.com/hzwwcOcfAN
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) July 9, 2023