Dilli Wali Girlfriend गाण्यावर धोनी-पांड्याने केला जबरदस्त डान्स, पार्टीचा न पाहिलेला व्हिडिओ समोर आला
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याआणि टीम इंडियाचे इतर खेळाडू शनिवारी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्याच्या पार्टीचा एक व्हिडिओ माहीची पत्नी साक्षी धोनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. यानंतर आता सोमवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी अष्टपैलू हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पार्टीचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा हार्दिक पांड्या आणि एमएस धोनीसह टीम इंडियाचे इतर खेळाडू डान्स करताना दिसत आहेत. धोनी आणि पंड्या शनिवारी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते. ईशान किशन आणि कृणाल पांड्या हे देखील या पार्टीचा भाग होते. हे सर्व खेळाडू बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताना दिसले. यासोबतच तो बॉलीवूड रॅपर बादशाहच्या गाण्यांवर डान्स करतानाही दिसला.
View this post on Instagram
अलीकडेच हार्दिक पांड्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. कर्णधार म्हणून हार्दिकच्या हातून आतापर्यंत एकही पराभव झालेला नाही. त्याने पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी चार सामने संघाने जिंकले आणि एक सामना बरोबरीत राहिला.
हेही वाचा – Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, एकाच षटकात ठोकले 7 षटकार