MPSC कडून 823 रिक्त पदांसाठी होणार भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख

0
WhatsApp Group

सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच  नोकरीसाठी (MPSC Job) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

पदांचा तपशील –

एकूण पदं – 823 पदं

  • निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक
  • राज्य कर निरीक्षक
  • सहाय्यक कक्ष अधिकारी
  • पोलीस उपनिरीक्षक

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

 परीक्षा फी –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा फी 719 रुपये असेल.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 449 रुपये परीक्षा फी असेल.

 PDF जाहिरात – Maharashtra Public Service Commission Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – MPSC Recruitment Online Application (18 ऑगस्ट पासून सुरु होतील)
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in