MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यात अव्वल

WhatsApp Group

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC) घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Result ) करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये सांगालीच्या प्रमोद चौगुले (Pramod Chaughule ) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने (Rupali Mane ) यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

आयोगाने पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी संपविला. मुलाखती संपल्यानंतर काही तासातच निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या लवकर निकाल जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 15 संवर्गातील 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल 2020 मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मार्च 2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी 2 लाख 62 हजार 891 उमेदवारांनी नोंदणी केली, तर 1 लाख 71 हजार 116 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.