
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान त्यांच्या साडीला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच त्यांच्या हे लक्षात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
पुण्यातील हिंजवडी येथे कराटे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठ्या परांनात गर्दी केली होती.
या कार्यक्रमाचं सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालत होत्या. त्यावेळी मूर्तीसमोरच समई पेटवलेली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर खाली आला. त्यामुळे साडीने लगेच पेट घेतला. मात्र त्यांनी साडीला लागलेली आग तात्काळ विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट#supriyasule pic.twitter.com/MtL8SGDgOh
— Inside Marathi (@InsideMarathi) January 15, 2023