Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना अटक होणार? नेमकं प्रकरण काय? वाचा…

WhatsApp Group

महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.