
मुंबई – सामाजिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.
Hanuman Chalisa row | Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana sent to judicial custody for 14 days by the Holiday and Sunday court of Metropolitan Magistrate, Bandra.
— ANI (@ANI) April 24, 2022
राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता रवी राणांची रवानगी आर्थर रोड तुरुंगामध्ये, तर नवनीत राणांची रवानगी भायखळा तुरुंगामध्ये केली जाईल.