राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग करत असताना घोड्यावरून एन्ट्री करताना गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
सध्या अमोल कोल्हे यांची प्रकृती ठीक आहे असं डॉक्टरांनी सांगण्यात आलं आहे. दरम्यान, शिवपुत्र संभाजी महानाट्याचे पुढील प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.